Psychological Effect of Caste https://youtu.be/T035dP-Lv3Y In Marathi, Buddhist scholar Bhadant Vimalkitti Gunasiri about the psychologically damaging effects of the caste system. Caste alienates us from all the rich human experiences a genuine human collective provides and as long as caste exists, every Indian will experience human collectivity in a distorted and atropied form within their own caste group. Says that even the higher castes are affected with inferiority complex, as they realise that their status is false, it creates an anti-social spirit, as natural.. sense of isolation..
जातिव्यवस्था आपल्या समाजाचं एक वास्तव आहे. या व्यवस्थेच्या उतरंडीत सवर्ण श्रेष्ठ तर दलित कनिष्ठ आहेत. या विभागणीमुळे तथाकथित सवर्णांना मान-सन्मान व आदर मिळतो तर दुसरीकडे दलितांना आयुष्यभर अपमान, भेदभाव आणि हिंसा सहन करावी लागते. ही व्यवस्था तथाकथित सवर्णांना श्रेष्ठता व अहंकाराची भावना देते तर दुसरीकडे दलितांचा आत्मविश्वास नष्ट करून न्यूनगंडात ढकलते. खरंतर जातीच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ समजणारे सवर्ण आणि स्वतःला कनिष्ठ समजणारे दलित दोघेही माणूसपणापासून दूर जातात आणि जातिव्यवस्थेचे गुलाम बनतात. सामाजिक आणि आर्थिक शोषणाबरोबरच जात मानसिक शोषणही करत असते.
जातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम काय आहेत?