https://www.loksatta.com/navimumbai/farmers-opposition-to-jnpt-to-usar-gail-air-channel-amy-95-3273000/

 

उरण: जेएनपीटी ते उसर गेलच्या वायू वहिनीला शेतकऱ्यांचा विरोध; वायू वाहिनीचा मार्ग बदलण्याची मागणी

November 18, 2022

 

उरण येथील गेल इंडियाच्या वायू वाहिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याची जाहीर सुनावणी शुक्रवारी जेएनपीटी च्या कामगार वसाहतीच्या ब हुद्देशीय सभागृहात घेण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या वायू वहिनीला देण्यास तीव्र विरोध केला आहे. त्याचप्रमाणे पिकत्या जमिनीतून वहिनी न नेता तिचा मार्ग बद्दलण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

परदेशातून बंदरामार्गे जहाजातून येणाऱ्या आयात वायू वाहून नेण्यासाठी जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसर अशी उरण, पेण व अलिबाग व पनवेल या चार तालुक्यातून गेलची वायू वाहिनी टाकण्यात येणार आहे.

या वाहिनीसाठी खोपटे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केली जाणार आहे. या वाहिनीच्या भूसंपदनाला प्रखर विरोध केला आहे.

यावेळी भूसंपदानाच्या प्रक्रियांची जबाबदारी असलेल्या उप जिल्हाधिकारी अश्विनी पाटील व गेल इंडियाचे संदीप कुमार मुख्य बांधकाम अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. या सुनावणीच्या दरम्यान शेतकऱ्यांनी वायू वाहिनी शेत जमिनी ऐवजी रस्त्या लगत च्या जमिनीतून नेण्यात यावी अशीही सूचना केली आहे.

काय मिळणार भूसंपदानाच्या बदल्यात शेतकऱ्यांची ३० मीटर रुंदीची जमीन यासाठी संपादीत करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पाईपलाईन कायद्याचा वापर केला जाणार असून शेतकऱ्यांना बाजार भावाच्या अवघी १० टक्के रक्कम(मोबदला) दिला जाणार आहे. त्याचवेळी या जमिनीचा शेतीसाठी वापर करता येणार असल्याचा।दावा केला आहे. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांवर अनेक प्रकारच्या अटी लादून जमिनीच्या वापरा पासून शेतकऱ्यांना रोखलं जात असल्याचा आज पर्यंतचा अनुभव शेतकऱ्यांनी कथित केला. तर भूसंपदानाच्या बदल्यात या कायद्यात पुनवर्सन म्हणून रोजगार दिला जाणार नाही.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपदान
उरणच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता भूसंपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये केंद्र सरकारने दिल्ली वरून वायू वाहिनीची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. मात्र या वाहिनी करीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी संजय ठाकूर,गोरख ठाकूर,अभिजत पाटील, राजू म्हात्रे, उन्नती गावंड,नरेश ठाकूर,रणजित भगत आदींनी या सुनावणी दरम्यान आपला विरोध दर्शविला

       
 (Google translate)

Uran: Farmers' opposition to JNPT to Usar Gail's Vayu Vahini ; Demand for rerouting of gas channel.
November 18, 2022

The notification for the land acquisition for GAIL India's Vayu Vahini in Uran has been issued and the public hearing was held on Friday in the regional hall of JNPT's labor colony.

At this hearing, the farmers have strongly opposed giving their land to the Vayu Vahini.  They have demanded that the pipeline be aligned in such a way that it does not take away arable land.

The proposed GAIL gas pipeline from JNPT to Usar in Alibaug taluka passes through four talukas namely Uran, Pen and Alibaug and Panvel to transport the imported gas coming from abroad through the port.

Farmers' lands in Khopte area will be acquired for this channel. The land acquisition of this channel has been strongly opposed. Deputy Collector Ashwini Patil who is responsible for land acquisition processes and Sandeep Kumar Chief Construction Officer of GAIL India and farmers were present. During this hearing, the farmers have also suggested that the gas channel should be taken from the land adjacent to the road instead of the farm land.

30 meters wide land of farmers will be acquired in exchange of land acquisition. For this, the central government's Pipeline Act will be used and the farmers will be paid only 10 percent of the market price. At the same time, it has been claimed that this land can be used for agriculture. But after that, the farmers alleged that the farmers are being prevented from using the land by imposing various conditions on them. In this Act, employment will not be given in lieu of land acquisition as reversion.


The process of land acquisition has been started without taking the Uran farmers into confidence in any way. In this, the Central Government has decided the outline of gas pipeline But the farmers whose lands are going to be taken for this channel were not taken into confidence, so the farmers expressed their anger.  Sanjay Thakur, Gorakh Thakur, Abhijat Patil, Raju Mhatre, Unnati Gawand, Naresh Thakur, Ranjit Bhagat etc. showed their opposition during this hearing.

    

  

E-library