Com. Dr. Rameshchandra Patkar
Senior member of the Marxist Communist Party, member of the editorial board of the state mouthpiece of the CPI(M) 'Jeevan Marg', writer, translator, thinker, painter of Janshakti Granth Prakashan, Lokvangmay Grih and many other publishing houses, popular retired professor of the Marathi department of Wilson College, Com. Dr. Rameshchandra Patkar passed away on 11 February 2025 in Mumbai at the age of 85 due to old age.

Rameshchandra Patkar was born on 16 November 1939. He remained loyal to Marxist ideology throughout his life. While working as a professor at Wilson College, in 1975, senior party leaders and former All India President of the Teachers' Association, Dr. Kishore Thekedutt, Prof. Rameshchandra Patkar and Prof. Sudhir Yardi, three of them, established the Teachers' Association in Mumbai-Maharashtra. They were on its executive committee for many years. They were always active in the historic strike of the teachers and many other movements.

Dr. Rameshchandra Patkar wrote important and quality writings on art. Today, many who have studied painting in Maharashtra have learnt the basic lessons of art history from the book 'History of Art' written by Patkar. Apart from this, Rameshchandra Patkar has made a valuable contribution to the art world of Maharashtra by completing the research book 'Art Thoughts in Maharashtra Magazines' with great perseverance. Patkar has translated articles and poems of many domestic and foreign writers from a humanistic perspective and has also published them.

 

 

कॉ. डॉ. रमेशचंद्र पाटकर 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ सदस्य, माकपचे राज्य मुखपत्र 'जीवन मार्ग'चे संपादक मंडळ सदस्य, जनशक्ती ग्रंथ प्रकाशन, लोकवांग्मय गृह व इतर अनेक प्रकाशन संस्थांचे लेखक, अनुवादकार, विचारवंत, चित्रकार, विल्सन महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे लोकप्रिय निवृत्त प्राध्यापक कॉ. डॉ. रमेशचंद्र पाटकर यांचे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई येथे वयाच्या ८५व्या वर्षी  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 

रमेशचंद्र पाटकर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. आयुष्यभर मार्क्सवादी विचारसरणीशी निष्ठापूर्वक बांधिलकी त्यांनी ठेवली. विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना १९७५ साली पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्राध्यापक संघटनेचे माजी अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. किशोर ठेकेदत्त, प्रा. रमेशचंद्र पाटकर आणि प्रा. सुधीर यार्दी या तिघांनी मुंबई-महाराष्ट्रात प्राध्यापक संघटनेची स्थापना केली. त्याच्या कार्यकारिणीवर ते अनेक वर्षे होते. प्राध्यापकांचा ऐतिहासिक संप व इतर अनेक आंदोलनांमध्ये ते नेहमीच सक्रिय असत.

डॉ. रमेशचंद्र पाटकर यांनी कलाविषयक महत्त्वपूर्ण व दर्जेदार लेखन केले. आज महाराष्ट्रात चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या अनेकांनी पाटकर यांनी लिहिलेले 'कलेचा इतिहास ' या पुस्तकातूनच कलाइतिहासाचे प्राथमिक धडे गिरवले. याशिवाय रमेशचंद्र पाटकर यांनी 'महाराष्ट्राच्या नियतकालिकांतील कलाविचार ' हे संशोधनपर पुस्तक अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्राच्या कला जगतास मोलाची देणगी दिली आहे. पाटकर यांनी अनेक देशी व परदेशी लेखक-लेखिकांच्या लेखांचे आणि कवितांचे मानवतावादी दृष्टिकोनातून भाषांतर केले असून ते प्रकाशितही झाले आहे.   

कॉ. डॉ. रमेशचंद्र पाटकर यांच्या निधनाबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी, जीवन मार्गचे संपादक मंडळ आणि जनशक्ती ग्रंथ प्रकाशन तीव्र शोक व्यक्त करत असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.

E-library